कोकण

-कोंढे येथील नदी घेणार मोकळा श्‍वास

CD

१० (टुडे पान १ साठी, अॅंकर)


-ratchl२१.jpg
२४M८१०१२
चिपळूण ः कोंढे येथील नदीतील गाळ उपसा कामाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर.
------------
कोंढे येथील नदी घेणार मोकळा श्‍वास

पाटबंधारे विभाग ; पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः झाडीझुडपांसह दगडगोटे, मातीने भरलेली कोंढे येथील नदी लवकरच मोकळा श्‍वास घेणार आहे. कोंढे व शिरळ गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि चिपळूण बचाव समितीचे राजेश वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे या नदीतील गाळ उपसा कामाचा श्रीगणेशा झाला आहे. पाटबंधारे विभागाकडून हा उपसा केला जात असून, या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. कोंढे व शिरळ या दोन गावांच्या सीमेवर असणारी नदी थेट वाशिष्ठीला जाऊन मिळते. या नदीकिनारी गावांमधील विहिरी आहेत. अलीकडच्या दशकात ही नदी दगडगोटे, मातीने अक्षरश: भरून गेली आहे. छोट्या छोट्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. पाटबंधारे विभागाने या नदीतील गाळउपशाकडे लक्ष न दिल्याने या नदीमध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली दिसून येत आहेत. कळवंडे धरण दुरुस्तीचे काम रखडल्याने आणि गाळ साचल्याने नदीत सध्या खडखडाट आहे. नदीलगतच्या विहिरींमधील पाणीपातळीही घटत आहे.
कोंढे येथील नदी खाडीला जाऊन मिळते. भरतीवेळी या खाडीचे पाणी अगदी मधलीवाडीपर्यंत आत येते. गाळ उपसा केल्यास ते पाणी थेट बौद्धवाडीपर्यंत पोहोचून पाणीप्रश्‍नही मार्गी लागण्याची शक्यता असल्याने कोंढे व शिरळ गावातून या नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली होती. चिपळूण बचाव समितीचे राजेश वाजे यांनी यासाठी पुढाकार घेऊन शासन व प्रशासनस्तरावर पाठपुरावा केला. अखेर या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. या नदीतील गाळ उपसा कामाचा शुभारंभ करण्यात आला. एक पोकलेन व डंपरच्या साह्याने सध्या गाळ काढला जात असून, आवश्‍यकतेनुसार यंत्रणा वाढवण्यात येणार आहे. या वेळी सरपंच माधवी कुळे, उपसरपंच हसन खान, राजेश वाजे, शशिकांत साळवी, अशोक नलावडे, ऋषिकेश नलावडे, रमेश करंजकर, फैयाज शिरळकर, शशिकांत राऊत, दिलीप कुळे, राकेश नलावडे, मिलिंद कदम आदी उपस्थित होते.
------
चौकट
नदीने बदलला प्रवाह

नदीत पाणी नसल्याने महिलावर्गाला कपडे धुण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर नदीने आपला प्रवाहही बदलला आहे. नदीलगत लोकवस्ती आहे. पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी असते. त्या पाण्याचा धोका लोकवस्तीला बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीकाळात नदीतील पाणी थेट शेतीत घुसते. भातशेतीचेही मोठे नुकसान होते. या नदीतील गाळ काढावा, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT