कोकण

मत-गंमत

CD

१९ (निवडणूक पानासाठी)

मत-गंमत---लोगो

तू कशाक तडमडतसं गावचो रस्तो बग...!

एप्रिल संपला मे महिना सुरू झाला. गावागावात, वाडीवस्तीत सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या पूजांना सुरवात झाली आहे. दरवर्षी चालणाऱ्या सार्वजनिक पूजांना काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड दिली जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक असे कार्यक्रम एक दिवसांचा जणू वाडीतील उत्सवच. एकीचे बळ म्हटले तर वावगं ठरू नये. असेच एका गावात श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त नाटक करायचे असे वाडीतील तरुणांचे ठरले; पण गावातील गोप्याही नाटकात काम करण्यास तयार झाला. गोप्या तसा नाटकवेडाचं. कुठलीही विनोदी भूमिका तो चांगल्या प्रकारे साकारत असे. त्यामुळे गावातील मंडळींनी हा सगळा भार त्याच्यावरच सोडला. मतदानाचा कालावधी असल्यामुळे गावात नाटकासाठी जमलेल्या लोकांचा फायदा घेण्यासाठी नाटकाच्या अगोदर नेतेमंडळींनी एकतास अगोदर मिळावा, असे गावकाराला कळवले होते. नाटकाच्या सरावाच्यावेळी ही गोष्ट गावकाराने गोप्या व नाटकमंडळींना सांगितली. त्यावर खडाजंगी रंगली. गावातील लोकांचा विचार करावा, असे साऱ्यांचेच म्हणणे होते. बरं, नाटकात १९ पात्रं काम करणार होती. त्यांची तयारी, नाटकातील तंत्रज्ञ या गोष्टी अडचणीच्या होत्या. किमान साडेदहाला नाटक सुरू करावे, असे सर्वांचेच मत होते; पण गावकाराच्या समोर बोलणार काय? हा प्रश्न नाटकमंडळीसमोर होता. पर्याय म्हणून आठ वाजता प्रचारसभेला नेतेमंडळीने यावे असे ठरले. नाटकाच्या रंगमंचावरच काही नेते व कार्यकर्ते मंडळी आली. भाषण करून निघून गेली. नाटकाला उशिरा सुरवात झाली. गोप्याचा रंगमंचावर प्रवेश झाला; पण सभेमुळे त्याचा अभिनयातील रंग उडाला होता. ताणही वाढला होता. नाटकातील विनोदी संभाषण पाठ असूनही गोप्या काहीतरी आक्रितच बोलला. तात्या...तात्या, इकासाच्या नावाखाली सगला चालाय काय?...अजून येळ गेली नाय. भूमिका करणारे बुजुर्ग तात्यांनी प्रसंगावधान राखून बोलले. गोप्या ह्या सारं वरूनच घडत येळ आली कळेल. तू कशाक तडमतास? मेल्या गावचो रस्तो बग.....यावर प्रेक्षकांमधून हश्या पिकला; पण काही का असेना, सत्य या निमित्ताने तोंडावर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT