कोकण

-सोल्ये रोड स्थानकावरून एसटी फेऱ्या हव्यात

CD

३ (टुडे पान १ साठी)

-rat२p९.jpg ः
P२४M८०९९९
राजापूर ः राजापूर रोडस्थानक.
------------

‘सोल्ये रोड स्थानकावरून
एसटी बसेस सोडा’
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः गेल्या काही वर्षामध्ये कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे; मात्र कोकण रेल्वेमार्गावरील तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकावर आल्यानंतर मूळ गावी जाण्यासाठी फारशा गाड्या उपलब्ध होत नसल्याने चाकरमान्यांची परवड होते. स्टेशनवरून गावी जाण्याच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेच्या प्रवाशापेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. त्यामुळे राजापूर एसटी आगार-शीळ-गोठणेदोनिवडे आंगलेमार्गे राजापूर रोड स्थानक अशी प्रायोगिक तत्त्वावर नवी बसफेरी सुरू करावी, अशी मागणी आंगले येथील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत, संजय सौंदळकर यांनी केली आहे.
राजापूर एसटी डेपो ते राजापूर रोड स्थानक व्हाया शीळ-गोठणे दोनिवडेमार्गे हातणकरवाडी-राघववाडी ते वाडेकर दुकान-आंगले सौंदळकरवाडी-राऊतवाडी-वरची राऊतवाडी-बौद्धवाडी-सरवणकरवाडी-नारकरवाडी-मांजरेकरवाडी-ब्राह्मणवाडी-कातळवाडी-शिंदेवाडी मार्गे सोल्ये- राजापूर रोड रेल्वेस्थानक या मार्गे एसटीची फेरी सुरू करणे गरजेचे आहे.
-------
गावात जाण्यासाठी दुप्पट खर्च

मुंबई ते राजापूर असा कोकणरेल्वेचा कमी खर्चाचा प्रवास असला तरी सोल्ये येथील कोकण रेल्वेच्या राजापूर स्थानकापासून पुढे आपल्या गावी जाण्यासाठी चाकरमान्यांना सुमारे पाचशे ते हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास बरा मात्र तेथून मूळ गावी जाण्याचा प्रवास नको, अशी म्हणण्याची वेळ चाकरमान्यांवर येते.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT