कोकण

क्रेडाईतर्फे कामगारांसाठी आरोग्य, नेत्रतपासणी शिबिर

CD

31 (टूडे ३ साठी)

)

- ratchl२३.jpg-
P24M81046
चिपळूण ः कामगारांची आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

क्रेडाईतर्फे कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : क्रेडाई चिपळूण परिवारातर्फे कामगारदिनाचे औचित्य साधून बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. बी. के. एल. वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण हॉस्पिटलच्या विशेष सहकार्याने शहरी आरोग्य केंद्र येथे हे शिबिर झाले.
या कार्यक्रमासाठी वालावलकर रुग्णालयाचे संदीप पाटील व तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ व क्रेडाई चिपळूणचे परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या शिबिराच्या उद्घाटनाला वालावलकर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि स्टाफ यांच्यासह क्रेडाई चिपळूणचे अध्यक्ष संतोष तडसरे व सीआरएमचे सहसचिव राजेश वाजे, माजी अध्यक्ष जावेद दलवाई, सचिव शकील चौगुले, प्रसाद खातू, खजिनदार राहुल काळी, समीर मेमन, मन्सूर देसाई आदी उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्ष संतोष तडसरे व राजेश वाजे यांनी मनोगत व्यक्त केले. मेडिकल सोशल वर्कर संदीप पाटील यांनी हॉस्पिटलमधील उपचारांच्या सुविधाबाबत विस्तृत माहिती सांगितली. हॉस्पिटलला भेट होणाऱ्या विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांविषयी माहिती दिली. सचिव शकील चौगुले यांनी डेरवण हॉस्पिटलच्या प्रमुख सुवर्णा पाटील यांच्यासह उपस्थित डॉक्टरांचे व स्टाफचे आभार मानले. या वेळी आरोग्य शिबिरात कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. क्रेडाई चिपळूण परिवार व डेरवण हॉस्पिटल यांच्यावतीने कामगारांना आवश्यक औषधाचे व आयड्रॉपचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरात अध्यक्ष संतोष तडसरे, राजेश वाजे, जावेद दलवाई, प्रवीण पटेल, शकील चौगुले, राहुल काळी, प्रसाद खातू, समीर मेमन, मन्सूर देसाई आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राहुल काळे, प्रसाद खातू यांनी विशेष मेहनत घेतली.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT