कोकण

होडावडेकरांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय

CD

टीप : swt२१७.jpg मध्ये फोटो आहे.
कुडाळ ः सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक अरुण होडावडेकर यांचा सत्कार करताना पंढरी चव्हाण. सोबत चंद्रकांत चव्हाण, सुरेश चौकेकर, अर्चना होडावडेकर, दिलीप चव्हाण, प्राजक्त चव्हाण आदी मान्यवर.
(छायाचित्र ः अजय सावंत)

होडावडेकरांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय
पंढरी चव्हाण ः कुडाळात चर्मकार समाजातर्फे सेवापूर्ती सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अरुण होडावडेकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कार्यरत असले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी येथे केले.
ओटवणे (ता. सावंतवाडी) जिल्हा परिषद शाळा नंबर १ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक अरुण होडावडेकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल भारतीय चर्मकार समाज मुंबई (महाराष्ट्र) यांच्यावतीने येथील मराठा सभागृहात सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. १) रात्री करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी भारतीय चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष सी. आर. चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, सुरेश चौकेकर, अनिल चव्हाण, श्रीमती होडावडेकर, अरुण होडावडेकर, अर्चना होडावडेकर, प्रकाश चव्हाण, संदीप गवस, दिलीप चव्हाण, खारभूमीचे उपविभागीय अधिकारी अनिल जाधव, जलसंपदा विभागाचे अधिकारी उमेश रांजनकर, प्रदीप कोठावडे, आकाश दानसे, संदीप होडावडेकर, मृणालिनी चव्हाण, डॉ. राहुल गव्हाणकर, सुनील चव्हाण, शिक्षक नेते राजन कोरगावकर, सचिन मदने, प्राजक्त चव्हाण, स्वप्नील होडावडेकर, रघुनाथ चव्हाण, मालिनी चव्हाण, भारत पेंडूरकर, गुरू पेंटर, अंकुश चव्हाण, सहदेव चव्हाण, डॉ. प्रतीक्षा चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय चर्मकार समाजाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘होडावडेकर यांनी आपल्या शालेय कारकिर्दीत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची सेवा बजावताना केलेले कार्य उल्लेखनीय आहे. समाजात अनेक संघटना आहेत; पण आपला समाज एक आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जगले पाहिजे. मी कोणत्या एका संघटनेचा नाही, तर समाजाचा आहे, हे ब्रीद घेऊन कार्य करा. होडावडेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात जी भरारी घेतली, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. सुरेश चौकेकर, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, प्रकाश चव्हाण, दिलीप चव्हाण, राजन कोरगावकर, सचिन मदने, रघुनाथ चव्हाण, स्वप्नील होडावडेकर आदींनी होडावडेकर यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन कोकण युवा अध्यक्ष भारत पेंडूरकर यांनी मानले

माझ्या यशोगाथेत
आई-वडिलांचे योगदान
आज माझा समाजाने जो गौरव केला, तो आठवणीतील ऋणानुबंध जोपासणारा क्षण आहे. माझ्या सर्वांगीण विकासात आई-वडिलांचे फार मोठे योगदान आहे. आज मी जो काही आहे, ते त्यांच्याच परिश्रमांचे फलित आहे, अशी भावना यावेळी सत्काराला उत्तर देताना होडावडेकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT