कोकण

''सहकार'' वार्षिक अंकाचे प्रकाशन

CD

४२ (पान २ साठी)


rat२p२६.jpg-
२४M८१०४५
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना डॉ. मकरंद साखळकर.
--------

‘गोगटे-जोगळेकर’च्या
सहकार अंकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार या वार्षिक अंकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. राधाबाई शेटये सभागृहात कार्यक्रम झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी उपस्थित होते. सहकारचे संपादक डॉ. तुलसीदास रोकडे यांनी सहकार या वार्षिक अंकाच्या अंतरंगाचा परामर्श घेतला. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी व उर्दू या पाच भाषांतील विविध विषयांवरील लेखांचा, कवितांचा समावेश अंकांमध्ये आहे. डॉ. तुलसीदास रोकडे यांनी आपल्या मनोगतात सहकार अंकाचे मुद्रक योगेश पंडित तसेच राकेश शेटये व संपादक मंडळाचे आभार मानले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सहकार हा विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे एक उत्तम व्यासपीठ आहे तसेच हा अंक विद्यार्थ्यांची सृजनशील क्षमता विकसित करतो, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Latest Marathi News Live Update : पुण्याला अवकाळीचा तडाखा, ३ तासात १४ ठिकाणी पडली झाडे

SCROLL FOR NEXT