कोकण

चिपळुणातून राऊतांचा सर्वाधिक मताधिक्य

CD

१६ (पान ५ साठी)

चिपळुणातून राऊतांना मताधिक्य देणार

शिरीष काटकर ः काविळतळीत महाविकास आघाडीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः शहरात होणाऱ्‍या मतदानापैकी ८० टक्के मतदान हे विनायक राऊत यांना मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना सर्वाधिक मताधिक्य हे चिपळूण शहरातूनच मिळणार असल्याचा विश्वास येथील महाविकास आघाडीचे समन्वयक माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी व्यक्त केला आहे.
चिपळूण शहरातील काविळतळी परिसरात महाविकास आघाडीची बैठक बुधवारी रात्री झाली. या वेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख शशिकांत मोदी,राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अविनाश केलस्कर, माजी उपजिल्हाप्रमुख राजू भागवत, वडार समाजाचे नेते हिंदुराव पवार, उपशहरप्रमुख भैय्या कदम यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक राऊत यांचा विजय निश्चित आहे; परंतु हा विजय विशाल झाला पाहिजे यासाठी आपल्याला काम केले पाहिजे. शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनदेखील काटकर यांनी केले. अतिशय विनम्रशील, सज्जन, निष्कलंकीत, सर्वसामान्य जनतेत मिसळणारा असा उमेदवार आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना दिल्लीत पाठवूया, असे आवाहन राजू भागवत यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT