कोकण

भाजपची चक्क ‘कॉल’द्वारे मतदारांना साद

CD

.६ (पान ३ साठी)

भाजपची ‘कॉल’द्वारे मतदारांना साद

निवडणुकीसाठी हायटेक प्रचारावर भर

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘चारसो पार’चा नारा दिला आहे. हे उद्दिष्ट पार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हायटेक प्रचार यंत्रणेवर भर दिला आहे. आतापर्यंत वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांमधून पक्षाच्या जाहिराती, जाहीर सभा, प्रचारपत्रके, प्रचारफेऱ्‍यांमधून प्रचाराची राळ उठवण्यात आली आहे. त्यातच आता चक्क नागरिकांशी मोबाईलवरून कॉलद्वारे संपर्क साधत ‘कमळाचे बटण दाबा, भाजपाला विजयी करा’, अशी थेट सादच घातली आहे. मोबाईलवर आलेल्या या कॉलची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध महायुतीचे उमेदवार नारायण राणे अशी थेट लढत होत आहे. घरोघरी प्रचारावर भर दिला जात आहे.
भाजपने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चारसो पार’चा नारा देत विरोधकांना आव्हान दिले आहे. भाजपकडून विजयासाठी नवनवीन युक्त्या लढवल्या जात आहेत. आता तर चक्क नागरिकांच्या मोबाईलवर कॉल केला जात आहे. पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्याची मोदींनी केलेल्या घोषणेची माहिती देतानाच ‘कमळाचे बटण दाबा, भाजपाला विजयी करा’, अशी साद घातली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT