कोकण

सी-वर्ल्डला विरोध केवळ मतांसाठी

CD

सी-वर्ल्डला विरोध केवळ मतांसाठी
निलेश राणेः शिवसेनेने नोटिफिकेशन का रद्द केले नाही ?
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २ः सी-वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पाला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्पाचे नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत ठाकरे गटाने केवळ विरोधाचेच राजकारण केले. मतदार संघात तसेच राज्यातील सर्वच प्रकल्पबाबत जनतेला भडकवून राजकारण करणे हेच काम ठाकरे गटाचे आहे, अशी टिका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. सी वर्ल्ड प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता आमचाही प्रकल्पाला विरोधच, हीच भुमिका आमची कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील वायंगणी येथे राणे यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सी वर्ल्ड प्रकल्पावरून केवळ राजकारण सुरू आहे. कोणताही विकासनिधी गावात येत नाही. गावच्या विकासासाठी स्थानिक आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांचे कोणतेही व्हिजन नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वायंगणी गावच्या सर्वांगीण व गतिमान विकाससाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यापुढे विकासकामांच्याबाबत वायंगणी गाव अग्रक्रमांच्या यादीत असेल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे खासदार होऊन मंत्री होतील. हक्काचा विकासनिधी या मतदारसंघात येणार आहे.’’
श्री. सामंत म्हणाले, राणे यांनी गावावर अन्याय केला नाही. मात्र विरोधकांनी नेहमीच राजकारण केले. राणे यांनी कोणतीही दडपशाही कधीही केली नाही. मात्र येथील अपयशी आमदार, खासदार यांनी कोणताही विकासनिधी न आणता जनतेला भडकवत राजकारणच केले.
यावेळी सरपंच रुपेश पाटकर, मालती जोशी, शामसुंदर नाईक, अर्चना सावंत, संजय सावंत, उमेश सावंत, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, राजन गावकर, दीपक सुर्वे, संतोष गावकर, दिपक पाटकर, रावजी सावंत, अण्णा धुळे, हनुमान प्रभू, बाळू वस्त, संतोष कोदे, डॉ. प्रमोद कोळंबकर, मंगेश गांवकर, मनोज हडकर, प्रफुल्ल प्रभू, सुशील शेडगे उपस्थित होते.

कोट
केंद्रीय मंत्री राणे यांनी गावावर अन्याय केला नाही. मात्र विरोधकांनी नेहमीच राजकारण केले. राणे यांनी कोणतीही दडपशाही कधीही केली नाही. मात्र येथील अपयशी आमदार, खासदार यांनी कोणताही विकासनिधी न आणता जनतेला भडकवत राजकारणच केले.
- दत्ता सामंत, भाजप प्रांतिक सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT