कोकण

साळशी-धनगरवाडीत पाणी टंचाई

CD

swt243.jpg
81171
देवगडः गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना साळशी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

साळशी-धनगरवाडीत पाणी टंचाई
ग्रामस्थांचे हालः निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ः तालुक्यातील साळशी-धनगरवाडी येथील पाणी प्रश्‍नाकडे संबंधित ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पाण्यावाचून ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आली. तेथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत संबंधित ग्रामस्थांनी येथील गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना निवेदन दिले.
स्थानिक ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यादव यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी विलास साळसकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जलजीवन मिशन अंतर्गत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी साळशी-धनगरवाडी नळ योजनेचे कोणत्याही प्रकारचे काम आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. गटविकास अधिकारी यांनी २५ एप्रिलला संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ काम सुरू करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले होते; पण अद्यापही संबंधित अधिकारी यांनी काम सुरू न केल्याने सध्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काम सुरू होईपर्यंत ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवत आहोत. त्यामुळे ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत साळशी-धनगरवाडी विहिरीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित ठेकेदारला कळविले असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT