कोकण

शिरवल येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

CD

शिरवल येथील विठ्ठल रखुमाई
मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह
कणकवली,ता. ३ः गुरुवर्य विवेकानंद (दादा) वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपार्शिवादाने व काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शिरवल टेंबवाडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरीनाम सप्ताह व ९ वा वर्धापनदिन सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येत्या ७ ते १४ मे या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन ७ मे रोजी सकाळी ९.०० वाजत काशिनाथ फोकमारे महाराज यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय यांच्या उपस्थितीत होणार आहे. काशिनाथ महाराज फोकमारे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी गजर माऊलीचा उत्सव किर्तनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले असून ‌७ मे १३ या कालावधीत रोज रात्री ८ ते १० वाजता नामवंत किर्तनकार आपली किर्तनरुपी सेवा सादर करणार आहेत. यामध्ये ७ मे रोजी ओंकार सुर्यकांत सावंत, शिरवल, ८ मे रोजी रामचंद्र महाराज कदम, कुंदे, ९ मे रोजी भूषण महाराज वरखले आळंदी, १० मे रोजी नंदू महाराज तेलंगे रायगड, ११ मे रोजी श्रीकृष्ण घाटे महाराज, देवगड. १२ मे रोजी डॉ. रविंद्र महाराज तावडे कुडाळ आणि १३ मे रोजी काशिनाथ फोकमारे महाराज तर शेगांव १४ मे रोजी काशिनाथ फोकमारे महाराज, शेगांव हे किर्तन सादर करणार आहेत. भाविक भक्तांनी आणि वारकरी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वनाथ गवंडळकर महाराज आणि विश्वस्त मंडळ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, शिरवल यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT