कोकण

खेड-कशेडी बोगद्यालगत मजबूत ''हाईट खांब'' उभारणार

CD

कशेडी बोगद्यालगत ''हाईट खांब'' उभारणार

अवजड वाहतूक रोखणार; खांब दोन दिवसात उखडले

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून दुतर्फा मार्गस्थ होणाऱ्या अवजड वाहतुकीला ''ब्रेक'' लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने बोगद्यापासून काही अंतरावर सलग तीनवेळा उभारलेले ''हाईट खांब'' अवघ्या दोन दिवसातच उखडल्याने दुतर्फा वाहतुकीतील गोंधळ कायम आहे. या पार्श्वभूमीवर बोगद्यातून मार्गस्थ होणारी अवजड वाहतुकीची वाहने रोखण्यासाठी आणखी मजबूत हाईट खांब उभारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला, तरी दोन्ही बाजूकडील अवजड वाहने येत-जात असल्याने वाहतुकीतील गोंधळ कायम आहे. बोगद्यातून दुतर्फा मार्गस्थ होणाऱ्या वाहतुकीला अटकाव करण्यासाठी बोगद्यापासून काही अंतरावरील पोलादपूर हद्दीतील भोगाव व तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्ग खात्याने सलग तीनवेळा ''हाईट खांब उभारले; मात्र अवघ्या दोन दिवसातच या खांबाची मोडतोड करत बिनधास्तपणे अवजड वाहने गेली. यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत असून, वाहतुकीतील गोंधळ अद्याप कायम आहे. यामुळे बोगद्यातून दुतर्फा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना अटकावासाठी आणखी मजबूत ''हाईट खांब'' उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतला आहे. येत्या काही दिवसांतच बोगद्यापासून काही अंतरावर दोन्ही बाजूंना हे खांब उभारण्यात येणार आहेत.
०००
कारवाईही होणार...
कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांना दुतर्फा वाहतुकीसाठी परवानगी दिलेली असतानाही वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने वाहतूक पोलिसांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT