कोकण

दळवी घराण्याचा मंगळवारी आंबडोस येथे गोंधळ उत्सव

CD

82765
श्री भवानी देवी


दळवी घराण्याचा मंगळवारी
आंबडोस येथे गोंधळ उत्सव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा गोंधळोत्सव मंगळवारी (ता. १४) आंबडोस-व्हाळवाडी (ता. मालवण) येथे आयोजित केला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याची आकार भवानी आंबडोस-व्हाळवाडी येथील दळवी घरात वास्तव्यास आहे. तिचा गोंधळ उत्सव दळवी भावकीच्यावतीने आयोजित केला जातो. त्यानुसार मंगळवारी (ता. १४) हा गोंधळोत्सव होणार आहे. या सोहळ्यास क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यानिमित्त उद्या (ता. ११) भवानीचे वास्तव्य असलेल्या घरात होमहवन होणार आहे. मंगळवारी गोंधळादिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळच्या सत्रात गोड्या जेवणाचा महाप्रसाद, दुपारी भक्ष्य देण्याचा कार्यक्रम व कातरवेळी जोगवा मागण्याचा मुख्य कार्यक्रम, उपस्थितांना महाप्रसाद व त्यानंतर प्रत्यक्ष गोंधळ कार्यक्रम सुरू होणार आहे. अंगणात भवानी मातेचा देव्हारा वाद्यांच्या गजरात आणून गोंधळाची मांडणी केली जाणार आहे. त्यानंतर ओठी भरणे कार्यक्रमाला प्रारंभ होईल. पहिल्या माहेरवाशिणींच्या ओठ्या भरून झाल्यावर भाविक आणि दळवी भावकीतील सुहासिनींचा ओट्या भरणे, दिवटीमध्ये तेल घालणे व रात्री १२ वाजता गोंधळी कथा कार्यक्रम होणार आहे. पहाटेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर भवानी मातेचा ‘उदो उदो’ करीत दिवटी विझविली जाणार आहे. यावेळी घरातील दिवंगतांच्या नावाने दान देऊन देव्हारा पुन्हा जागी आणला जाणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी भावकी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT