कोकण

जिल्ह्यात सात तालुक्यात बांबू लागवडीकडे दुर्लक्ष

CD

२६ (टूडे २ साठी)

सात तालुक्यात बांबू लागवडीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायतींमध्ये बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामधून १४ लाभार्थी निवडण्यात आले. त्यावर सुमारे दीड लाख इतका खर्च करण्यात आला. यामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यांचा समावेश आहे तर सात तालुक्यात बांबू लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याने ते अजूनही उपेक्षितच आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांबू लागवड आणि फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. या योजनांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या हातात खेळते भांडवल आले असले तरी जिल्ह्यातील ७ तालुक्यांनी सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे किरकोळ खर्च झालेला आहे तर राजापूर आणि लांजा तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी बांबू लागवडीचा उपक्रम राबविला. यातून दीड लाख निधी शासनाचा खर्च झाला. यासाठी कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी या सर्वांचे मोठे योगदान लाभले. अन्य तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांनी किरकोळ काम केल्याने आणि जनजागृतीचे प्रमाण कमी असल्याने बांबू लागवड योजना या तालुक्यात होऊ शकलेली नाही. त्यामध्ये चिपळूण, गुहागर, दापोली, खेड, रत्नागिरी, मंडणगड या तालुक्यांचा समावेश आहे. या निमित्ताने दर महिन्याला गटविकास अधिकारी नेमका कोणता आढावा घेतात, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : अर्शदीप सिंगची IND vs WI पाचव्या ट्वेंटी-२०तू माघार? भुवनेश्वर कुमारची एन्ट्री, टीम इंडियाची Playing XI जवळपास निश्चित

Mumbai News: कुर्ला-ट्रॉम्बेतील झोपड्यांना मध्य रेल्वेच्या नोटिसा, ३० दिवसांचा अल्टिमेटम; नेमकं कारण काय?

RECIPE: तुम्ही कधी दोडका-पनीरची भाजी खाल्ली का? नीना गुप्ता यांनी सांगितली सोपी रेसिपी, जाणून घ्या...

Raigad News: 'शेतकरी कर्जमुक्ती'ची तिसरी यादी जाहीर, रायगड जिल्ह्यातील एक हजार ३३४ लाभार्थी

Marathi News Live Updates: तिरंगा आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालय म्हणाले छोट्या दुकानदारांच्या उदरनिर्वाहाचा विचार आवश्यक

SCROLL FOR NEXT