कोकण

सम्यक साहित्य संसदेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण

CD

सम्यक साहित्य संसदेतर्फे
रविवारी पुरस्कार वितरण

कणकवली मराठा मंडळ नाट्यगृहात सोहळा

कणकवली,ता. १० ः सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेकडून आबा शेवरे जीवनगौरव व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदा हा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान सोहळा रविवारी (ता. १२) सायंकाळी ४ वा. कणकवली येथील मराठा मंडळ नाट्यगृह, येथे होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्याधिष्ठित समाजरचनेची आणि क्रांतीगर्भ तत्त्वज्ञानाची प्रेरणा घेऊन मानवी तत्त्वज्ञानाचे पोषण करणाऱ्या विचारवंत, लेखक, कवी, समीक्षक यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले जाते, असे आयोजकांनी सांगितले. यावेळी आंबेडकरी विचारवंत, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी डॉ. अनिल धाकू कांबळी, कवी, कथाकार, वैचारिक लेखक सुनील हेतकर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक माधव कदम, निवृत्त नगररचनाकार, कवी, कथाकार पुरुषोत्तम लाडू कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. काव्य पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सम्यक संसदेचे कार्यवाह राजेश कदम, कोषाध्यक्ष संध्या तांबे व माजी अध्यक्ष अरुण नाईक यांनी केले आहे. यावर्षी कोकणातील पुरोगामी कवितेचे जनक कविश्रेष्ठ आ.सो.शेवरे स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार -२०२३, ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक मोतीराम कटारे यांना वितरीत केला जाणार आहे. तर विद्रोही आंबेडकरी कवी, कार्यकर्ता उत्तम पवार स्मृती, उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार-२०२३ हा पुरस्कार आंबेडकरी कवी प्रा.सिद्धार्थ गोपाळ तांबे (कवितासंग्रह: सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने) यांना वितरीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi Update Live: TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

SCROLL FOR NEXT