कोकण

सावडाव ग्रामस्थ निवेदन

CD

८२७८८


भू संपादनाआधीच धरणाचे काम

सावडाववासीयांची तक्रार ः ठेकेदारावर फौजदारी करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० : सावडाव (ता.कणकवली) येथे धरण प्रस्तावित आहे; मात्र या धरणासाठी भू संपादन प्रक्रिया न राबवताच ठेकेदार आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीमध्ये घुसखोरी आणि अतिक्रमण केले आहे. त्‍यामुळे दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सावडाव ग्रामस्थांनी आज केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी आज कणकवली पोलिसांत दिले.
सावडाव येथील ग्रामस्थ वैभव सावंत यांच्यासह आनंद नरसाळे, संजय वारंग, विष्‍णू झगडे, सुहास पाताडे, जयवंत वारंग, सुरेश मोरे, वसंत वारंग, मधुकर कांबळे, सुरेश जाधव, महेंद्र तेली आदींसह सुमारे ३४ जमीन मालकांनी आज कणकवलीचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर उपस्थित होते.
सावडाव गावात धरण क्र. २ मंजूर झाले आहे. महिन्यापूर्वी या धरणाचे भूमिपूजन केले. मात्र प्रत्‍यक्ष काम करण्यापूर्वी धरण प्रकल्‍पात येणारी झाडे, घरे, बांधकामे, विहिरी, जमिनी आदींची मोजणी होऊन त्‍याचा मोबदला निश्‍चित होणे आवश्‍यक होते. तशी कोणतीही कार्यवाही न करताच जलसंधारण विभागाचे अधिकारी श्री. शिरोडकर आणि कामाचा ठेका घेतलेल्‍या ठेकेदाराने धरणाचे काम सुरू केले आहे, अशी भूमिका सावडाव ग्रामस्थांनी मांडली.
भूसंपादनाची प्रक्रिया न करताच धरणाचे काम पूर्ण करण्यात आले तर सावडाव येथील प्रकल्‍पग्रस्तांना कोणताही मोबदला रक्‍कम मिळणार नाही. हक्‍काच्या जमिनीपासूनही त्‍यांना वंचित राहावे लागणार आहे. त्‍यामुळे आमच्या जमिनीत अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल व्हायला हवेत. याबाबत कार्यवाही न झाल्‍यास आम्‍ही आंदोलन करणार आहोत. त्‍यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्‍यास त्‍याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सावडाव ग्रामस्थांच्या वतीने वैभव सावंत यांनी दिला. तसेच याबाबतचे निवेदनही प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT