कोकण

तिलारी कालव्याच्या पाणी विसर्गात वाढ

CD

82795
बांदा ः शाखा कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)


तिलारी कालव्याच्या पाणी विसर्गात वाढ

बांदावासीयांमध्ये समाधान ः विहिरींची पाणी पातळी वाढली

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने शाखा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी बांदा परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महिनाभरापूर्वी पाणी कमी असल्याचे कारण देत बांदा शाखा कालव्यातील पाणी बंद केले होते. त्यामुळे याचा परिणाम येथील विहिरीच्या पाणी पातळीवर झाला होता. तसेच स्थानिक ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवर देखील याचा विपरीत परिणाम झाला होता. बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्यात पूर्ववत पाणी न सोडल्यास कालव्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
काही दिवसांपूर्वी कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आता पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सुरु झाल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून बागायतींना देखील कालव्याचे पाणी मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. पाण्याचा विसर्ग वाढविल्याने कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी पोहोचले आहे. पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
---
ग्रामपंचायतीच्या नळयोजनेलाही फायदा
बांदा ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेला देखील या कालव्याचा फायदा झाला आहे. कालव्यातील पाणी अचानक बंद करण्यात आल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. पाण्याअभावी बांदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. आता मात्र पाणी पूर्ववत सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT