कोकण

यादव चॅरिटीतर्फे गवळी विद्यार्थ्यांना आवाहन

CD

पान ५
गवळी समाजातील विद्यार्थ्यांना
यादव चॅरिटीतर्फे आवाहन
चिपळूण : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या चिपळूण शाखेच्या ४५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गवळी समाजातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात येणार आहेत. परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कलिस्टची झेरॉक्स कॉपी शहरालगतच्या कापसाळ येथील माटे संकुलातील गवळी समाज हॉल येथे जमा करावी तसेच अकरावी व पंधरावीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत. त्यांनी सुद्धा मार्कलिस्टची झेरॉक्सप्रत जमा करणे बंधनकारक आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी विश्वस्त नारायण ठसाळे यांनी दिली आहे.

धामापूरला आज सत्यनारायण महापूजा
चिपळूण ः क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ धामापूर (वरची राऊळवाडी) ग्रामस्थ व महिला मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ सभागृह येथे आज शनिवारी (ता. ११) श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त शुक्रवारी लहान मुलांचे गंमतीदार खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शनिवारी सकाळी ८ वा. दीपप्रज्वलन सोहळा, ८.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, १२ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. हळदीकुंकू समारंभ, ५ वा. आमदार शेखर निकम यांचा स्वागतसोहळा, ६ वा. क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ युवा यांचे सुस्वर भजन, रात्री १०.३० वा. श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ तुरळ हरेकरवाडी यांचे बहुरंगी नमन होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठल चव्हाण, खजिनदार विशाल जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Marathi News Live Updates : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT