कोकण

रत्नागिरी-गणपतीपुळ्यात गणेशाला हापूसची आरास

CD

-rat10p21.jpg
82786
रत्नागिरी ः श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती बाप्पासमोर आंब्याची आरास करण्यात आली.

गणपतीपुळ्यात गणेशाला हापूसची आरास

अक्षय तृतीयेचे औचित्य; ९ डझन आंब्यांनी सजावट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : अक्षय तृतीयेनिमित्त शुक्रवारी (ता. १०) श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती बाप्पाची आंब्याने पूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात ९ डझन आंब्याची आरास करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील सिद्धेश विजय वैद्य व मंजिरी वैद्य यांनी पूजेसाठी पिकलेले आंबे पाठविले आहेत.
वैद्य कुटुंबीयांकडून गेली दहा-बारा वर्षे गणपतीसाठी आंबे पाठविले जात आहेत. त्यांचा आंब्याचा व्यवसाय असून गणपतीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती व गणपतीपुळे येथील मंदिरात दोन डझनचा आंबा प्रसादासाठी पाठवितात. सिद्धेश वैद्य यांचा हा उपक्रम गेली १० ते १२ वर्षे सुरू आहे; मात्र सिद्धेश यांना गणपतीपुळ्यातील गणेश मंदिरात आंब्याची आरास करण्याची संकल्पना सुचली. त्यांनी तेथील पुजाऱ्यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनीही सकारात्मकता दर्शवली. दरवर्षी आंब्याच्या हंगामात एखादा चांगला दिवस पाहून आंब्याने बाप्पाची पूजा केली जाते. आंब्याच्या पूजेचा हा उपक्रम आठ वर्ष सुरू आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला पूजा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गुरुवारी (ता. ९) नऊ डझन पिकलेले आंबे त्यांनी गणपतीपुळे येथे पूजेसाठी पाठविले. गणपती मंदिरातील आंब्याची आरास पाहण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली होती.

कोट
आंबा हंगामातील कामामुळे दरवर्षी पूजेसाठी खास जाता येत नाही; परंतु हंगाम संपल्यानंतर आवर्जून संपूर्ण कुटुंबासह दर्शनासाठी जात असल्याचे सिद्धेश यांनी सांगितले. गणपतीवर माझी व माझ्या कुटुंबीयांची मनोभावे श्रद्धा आहे. श्रद्धेतूनच आम्ही आंबे पूजेला पाठवित आहोत.
- सिद्धेश वैद्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT