कोकण

चिपळूण-गाणे खडपोली एमआयडीसीत पुन्हा वणवा

CD

-rat10p24.jpg
82811
चिपळूण : तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत लागलेल्या वणव्यात कचऱ्याचे ढीग जळून खाक झाले.

गाणे खडपोली एमआयडीसीत वणवा

कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण; वणवे लावणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. १० : गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत सातत्याने वणवे लागत आहेत. या वणव्याची धग कारखान्यांना लागल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एमआयडीसी परिसरात हे वणवे कोण लावत आहेत त्यांचा शोध घेण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.
गाणे खडपोली एमआयडीसीमध्ये या आठवड्यात तब्बल तीनवेळा वणवे लावण्यात आले. गुरूवारी दुपारी कृष्णा अँटिऑक्साइड आणि अमर प्लास्टिक या दोन कंपन्यांपासून काही अंतरावर वणवा लागला होता. या वणव्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कंपनीचे अधिकारी घटनास्थळी गेले. वणवा विझवण्यासाठी त्यांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले. चिपळूण पालिका आणि लोटे एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे बंब आल्यानंतर लागलेला वणवा आटोक्यात आला. एमआयडीसीमध्ये असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागल्यानंतर उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सातत्याने वणवे लागत असल्याने उद्योजकांमध्ये भीती आहे. तिन्ही वणवे कडक ऊन असताना दुपारच्या वेळी लावण्यात आले. हे वणवे नक्की कोण लावत आहे, त्याचा शोध घेण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.
------------
चौकट
कंपनीचे नुकसान नाही
गुरूवारी दुपारी एमआयडीसीतील कृष्णा अँटिऑक्साइड कंपनीपासून काही अंतरावर वणवा लागला. यामध्ये कंपनीचे कोणत्याही साहित्याची नुकसान झालेले नाही. वणव्याची माहिती कळल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. हे प्रकार सातत्याने होत आहेत त्याची भीती आहे. वणवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.
- सुयोग चव्हाण, प्रशासकीय अधिकारी, कृष्णा अॅंटिऑक्‍साईड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT