कोकण

चंद्रनगरची वेदिका मुलुख ठरली आदर्श विद्यार्थी

CD

. ४१ (पान ४ साठी)

वेदिका मुलुख ठरली आदर्श विद्यार्थी

दाभोळ, ता. ११ : दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील शिक्षण कला क्रीडा संस्थेने आयोजित वार्षिक सर्वसाधारण समारंभात चंद्रनगर गावातील विद्यार्थ्यांसाठीचे विविध पुरस्कार जाहीर केले. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित करून गौरवण्यात आले. चंद्रनगर शाळेतील सातवीतील विद्यार्थिनी वेदिका मुलुख हिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला.
यावर्षी संस्थेने चंद्रनगर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंध, स्मरणशक्ती, संगीतखुर्ची यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून आकर्षक व शालोपयोगी बक्षिसे देण्यात आली. शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून वेदिका मुलुख, गुणवंत विद्यार्थी म्हणून पूर्वा जगदाळे तर गरीब व होतकरू विद्यार्थी म्हणून वैष्णवी आंबेलकर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणाला संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलुख, उपाध्यक्ष शैलेश मुलुख, सचिव स्वरूप मुलुख, सल्लागार विजय मुलुख, सुनील रांगले, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT