कोकण

भरणेतील पाणीपुरवठा सुरळीत

CD

पान ३
भरणेतील पाणीपुरवठा सुरळीत
खेड : भरणे ग्रामपंचायत हद्दीतील विस्कळीत पाणीपुरवठा अखेर पूर्ववत झाल्याने ऐन सुटीच्या हंगामात ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पंपामध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित होत होता. भरणे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यासाठी चांगल्या दर्जाचे पंप खरेदी केले आहेत. यामुळे पंपांमध्ये होणारा तांत्रिक बिघाड दूर होऊन जलवाहिनीतील त्रुटीही संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे मुबलक प्रमाणात ग्रामस्थांना पाणीपुरवठा वितरित होत आहे. सुटीचा हंगाम सुरू असल्याने चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. भरणे परिसरातील सुरळीत पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

विलास यादवांवर अंत्यसंस्कार
खेड : तालुक्यातील वरवली-देऊळवाडी येथील सुपुत्र व मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या विलास तुळशीराम यादव यांचा सेवा बजावताना मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी रात्री ८ वाजता डोंबिवली-नवापाडानजीकच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मतदानाच्या दिवशी ड्युटी बजावत असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता, मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने पोलिसदलात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT