कोकण

गवळी समाजातील विद्यार्थ्यांना आवाहन

CD

१८ (पान ५ साठी, संक्षिप्त)

गवळी समाजातील विद्यार्थ्यांना
यादव चॅरिटीतर्फे आवाहन

चिपळूण : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या चिपळूण शाखेच्या ४५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गवळी समाजातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात येणार आहेत. परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कलिस्टची झेरॉक्स कॉपी शहरालगतच्या कापसाळ येथील माटे संकुलातील गवळी समाज हॉल येथे जमा करावी तसेच अकरावी व पंधरावीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत. त्यांनी सुद्धा मार्कलिस्टची झेरॉक्सप्रत जमा करणे बंधनकारक आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी विश्वस्त नारायण ठसाळे यांनी दिली आहे.
-----------
धामापुकात सत्यनारायण महापूजा

चिपळूण ः क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ धामापूर (वरची राऊळवाडी) ग्रामस्थ व महिला मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ सभागृह येथे आज श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त शुक्रवारी लहान मुलांचे गंमतीदार खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आज सकाळी ८ वा. दीपप्रज्वलन सोहळा, ८.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, १२ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. हळदीकुंकू समारंभ, ५ वा. आमदार शेखर निकम यांचा स्वागतसोहळा, ६ वा. क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ युवा यांचे सुस्वर भजन, रात्री १०.३० वा. श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ तुरळ हरेकरवाडी यांचे बहुरंगी नमन आदी कार्यक्रम झाले.
--------------
खेड सायकलिंग क्लबची
मंदिर परिसरात स्वच्छता

पावस ः खेड तालुक्यातील खेड सायकलिंग क्लबने आंबये ग्रामदेवता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून कचरा संकलन केले. या मोहिमेत सायकलिंग क्लबच्या सदस्यांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी १० पोती प्लास्टिक कचरा जमा करत चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र संघाकडे वर्गीकरण व प्रक्रियेसाठी सुपूर्द केला. दोन दिवसांपूर्वी सायकलिंग क्लबने मुरडे येथे राममंदिर व खेमनाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. त्या पाठोपाठ आंबये येथील ग्रामदेवता मंदिर परिसरातही स्वच्छतामोहीम राबवली. तेथील ग्रामदेवता मंदिराची वार्षिक जत्रा नुकतीच पार पडली होती. या पार्श्वभूमीवर सायकलिंग क्लबने स्वच्छतामोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. परिसरातून १० पोती प्लास्टिक कचरा संकलन करत परिसर स्वच्छ केला.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT