कोकण

शहरात आघाडीला मिळणार मताधिक्य

CD

१९ ( पान ३ )
-----------

चिपळुणात आघाडीला मताधिक्य
मिळणार ः लियाकत शाह

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : लोकसभा निवडणुकीसाठी चिपळूण शहरातील ४० केंद्रांवर ५९ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना किमान आठ हजाराचे मताधिक्य मिळणार,असा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ते म्हणाले, चिपळूण शहरातील मतदारांनी या वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सकाळपासूनच शहरातील ४० मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांचा सहभाग लक्षणीय दिसत होता तर नव मतदारांनीदेखील आवर्जून हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. या वेळची लोकसभा निवडणूक ही व्यक्तीशः उमेदवारांसाठी न होता संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी झाली. त्याची चुणूक चिपळूण शहरातील प्रत्येक केंद्रावर दिसून आली. या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात आधीपासूनच भाजपविरोधी वातावरण होते. त्यात प्रामुख्याने धोक्यात असलेले संविधान, लोकशाही, बेरोजगारी आणि महागाई आदी मुद्‌‍द्यांवर मतदार चर्चा करत होते. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषेदेखील दाखवली गेली; मात्र, या निवडणुकीत संविधान, बेरोजगारी आणि महागाई हे कळीचे मुद्दे ठरले.
मुळात भाजपच्या राजवटीत सुरवातीपासून घोटाळे, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि राजकीय नेत्यांना तुरुंगवास, असे शब्द मतदारांच्या कानावर कायम पडत होते. त्याची मतदारांमध्ये मोठी चीड निर्माण झाली होती. त्या भावनेतून मतदार बाहेर पडले आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे मतदान झाले. चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना आठ हजारांची आघाडी मिळणार, असे शाह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT