कोकण

शिस्तबद्ध, प्रामाणिक, विज्ञाननिष्ठ राहा

CD

२५ पान ५ साठी

rat११p१४.jpg-
२४M८२९५३
रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बीसीए कॉलेजमधील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसमवेत डॉ. अरविंद कुलकर्णी, अध्यक्ष मंदार सावंतदेसाई, प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर व शिक्षक.


शिस्तबद्ध, प्रामाणिक, विज्ञाननिष्ठ राहा

डॉ. अरविंद कुलकर्णी ः भारतीय संस्कृतीचा अभिमान हवा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : वक्तशीर, शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि विज्ञाननिष्ठ राहा तसेच भविष्यामध्ये कितीही मोठे झालात तरी आपल्या आई -वडिलांना, गुरूजनांना विसरू नये. आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा आपल्याला कायम अभिमान असला पाहिजे. भारतीय पदवी संपादन करताना त्याचबरोबर परदेशी पदवीसुद्धा मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या भारत देशासाठी करा, असे प्रतिपादन लांजा कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बीसीए कॉलेजच्या बॅचच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. मातोश्री यशोदा यशवंतराव पवार सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांनी बीसीएच्या २२व्या बॅचचा पदवीदान समारंभ असून, २५ पैकी ४ विद्यार्थिनींना विशेष श्रेणी मिळाली. ९ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी मिळाल्याचे सांगितले.
मंदार सावंतदेसाई यांनी विद्यार्थिनींना पदवीनंतर पदवीत्तर शिक्षण घ्या त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देण्याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेमध्ये विद्यार्थिनींना शिक्षण घेत असताना संस्था गरीब व गरजू विद्यार्थिनींसाठी देणगी स्वरूपात संकलित करत असलेल्या भाऊबीज निधीचे महत्व सांगून हा निधी विद्यार्थिनींनी आपली सामाजिक जबाबदारी समजून यापुढे देखील संकलित करावा, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Ambegaon gas distribution: ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम: आंबेगाव तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर अवसरी खुर्दमध्ये सव्वा महिन्यानंतर गॅस टाक्यांचे वितरण सुरू

Shirur Crime News: शिरूरमध्ये एटीएसची कारवाई; सतरा कमानी पुलाजवळ दोन जणांना अटक, गावठी पिस्तुल जप्त

SCROLL FOR NEXT