कोकण

खेडसह ग्रामीण भागात पाऊस

CD

३२ ( पान ३ )
-----------

rat११p२०.jpg -
OP24M83004
खेड ः अचानक झालेल्या पावसामुळे खेड बसस्थानकातील प्रवाशांची उडाली त्रेधा.

rat११p२१.jpg -
P24M83005
वादळी पावसामुळे खेड शहरातील नाना-नानीपार्कजवळ झाड कोसळले.
-------------

खेडसह ग्रामीण भागात पाऊस

वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली ; आंबा काजूच्या बागांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

खेड, ता. ११ : हवामानखात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आणि शनिवारी संध्याकाळी खेड शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाचा शिडकावा झाला. ग्रामीण भागात वादळीवाऱ्‍यांनी अनेक झाडे कोसळली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून विद्युतपुरवठा खंडित झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी अचानक जोरदार वारा सुटला. ऐन उन्हाळ्यामध्ये विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आंबा-काजूच्या बागा यांचे मोठे नुकसान झाले असून, बागायतदार हताश झाले आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ उडाली.
ऐन मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हापूस, काजू, करवंद, जांभूळ या कोकणमेव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणातील आंबा, काजू ही पिके आधीच धोक्यात आली आहेत. त्यात आता पुन्हा अवकाळीचे संकट आले असल्याने हापूस आणि काजूचे नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहे.

चिपळुणात तासभर पाऊस

चिपळूण शहरात दिवसभर कडकडीत ऊन आणि उकाड्याने हैराण केलेले असतानाच शनिवारी सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कमी असला तरी सुमारे तासभर धार सुरू होती. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच कडकडीत ऊन आणि प्रचंड उन्हाळा जाणवत होता. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. उन्हाचा कडाका पाहता अवकाळीची शक्यतादेखील वर्तवण्यात येत होती; परंतु एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झाला तरी अवकाळीचा पत्ता नव्हता. त्यामुळे नुकसान होणार असले तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती. शनिवारी सायंकाळी ४ नंतर अचानक वातावरण बदलले. काहीसा अंधार होऊन एका बाजूने सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि काहीवेळेतच पावसाला सुरवात झाली. पावसाला जोर नव्हता; परंतु तासभर पाऊस सुरू होता.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT