कोकण

चाकू हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडी

CD

चाकू हल्लाप्रकरणी
न्यायालयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : शेंडी पागण्याच्या कारणावरून सर्जेकोट येथील संतोष सत्यवान शेलटकर (रा. कोळंब, खालचीवाडी) याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या हर्षल पराडकर याची पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा आज न्यायालयात हजर केले; मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संतोष शेलटकर व त्याचा मित्र जगन्नाथ सावजी हे १ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सर्जेकोट जेटीवर आले असता संशयित पराडकर याने शेंडी पागण्याच्या कारणावरून शेलटकर यांना शिवीगाळ केली. मारहाण करून त्यांच्यावर चाकूचे वार केले होते. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार येथील पोलिसांनी पराडकर याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्यावर पराडकर याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला; मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावत त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT