कोकण

बांद्यात मुसळधार पाऊस

CD

टीपः swt11१४.jpg मध्ये फोटो आहे.
83032
बांदा ः शहराला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात मुसळधार पाऊस

सावंतवाडी, कुडाळमध्येही जोरदार; जिल्हाभरात वातावरण

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः जिल्ह्यात तापमानवाढीचा कहर सुरू असताना आज सायंकाळी बांदा, सावंतवाडी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यात देखील विजांचा कडकडाट रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. आज झालेला पाऊस आणि पुढील चार दिवसांत असलेली शक्यता यामुळे आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सदृश वातावरण आहे. तापमानवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. आज सकाळपासून प्रचंड उकाडा होता. त्यानंतर सायंकाळी ४ पासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले. बांदा परिसरात सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. बांद्यानंतर सावंतवाडीसह कुडाळ तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती आहे. आज पडलेल्या पावसामुळे बांदा व सावंतवाडीतील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सध्या आंबा हंगाम ऐन रंगात आलेला आहे. आंबा काढणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आणखी दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात आंबा काढणी होण्याचा अंदाज आहे; परंतु जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्यामुळे आंबा बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.
......................
चौकट
पूर्वपट्ट्यात आंब्याचे नुकसान अटळ
हवामान विभागाने पुढील चार-पाच दिवसांत पूर्वमोसमी पावसाचा अंदाज दिला आहे. हा पाऊस पूर्वपट्ट्यात अधिक होत असल्याचा इतिहास आहे. या भागातील आंबा अजूनही काढणीयोग्य झालेला नाही. पुढील आठ ते दहा दिवसांत तो काढणीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील आंब्याचे नुकसान अटळ मानले जात आहे.
...................
चौकट
धार्मिक कार्यक्रमांवर पावसाचे विघ्न
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी आलेले आहेत. गावागावांत सार्वजनिक कार्यक्रम सुरू आहेत; परंतु हवामान विभागाने जिल्ह्याच्या काही भागांत १३ व १४ मे रोजी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या कार्यक्रमांवर देखील पावसाचे विघ्न उभे राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT