कोकण

आशा महिलांना मानधन वाढीचा लाभ द्या

CD

आशा महिलांना मानधन वाढीचा लाभ द्या
संघटना आक्रमक ; ईमेलवरून निवेदन पाठवले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः आशा महिलांना १ नोव्हेंबर २०२३ पासून दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढ देण्याच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील प्रत्येक आशा महिलेला थकीत तीस हजार रुपये मानधन वाढीची रक्कम मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य अशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी व अध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिला आहे.
आशा व गटप्रवर्तक महिलांनी मार्च २०२४ पर्यंत बेमुदत संप केल्यानंतर १३ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने आशा महिलांना मानधन वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार अद्यापही सात महिने होत आले, तरीही ती रक्कम आशांना मिळालेली नाही. या महिलांचे मानधन महागाई वाढीशी जोडलेले नसल्यामुळे वाढत्या महागाईच्या काळामध्ये सध्या असलेले मानधन अत्यंत अपूरे आहे. या महिलांना सध्या उपासमारीमध्ये जगावे लागत आहे.
किमान मागील सहा महिन्याची तीस हजार रुपये मानधन वाढीची रक्कम महाराष्ट्रातील प्रत्येक आशा महिलांना मिळाली पाहिजे. अन्यथा अशा महिलांना तातडीने तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन संघटनेने महाराष्ट्र शासनाला १० मे रोजी ईमेल द्वारे पाठवले आहे.
शासनाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव धीरज कुमार यांना निवेदन मेल केले आहे. आशांना मागील सहा महिन्यापासून पगार वाढ झालेली आहे, म्हणून आरोग्य खात्यातील शासकीय अधिकारी आशांवर कामाची सक्ती केली जात आहे. नेमून दिलेल्या कामाशिवाय इतर कामे सांगण्यात येतात. या प्रकारे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पाठवलेले निवेदन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या सुरू असून हे निवेदन सर्व आशा महिलांनी सह्या करून हजारोंच्या संख्येने मुख्य सचिव, आवर मुख्य सचिव व अभियान संचालक यांनाही पाठवावे असे आवाहन शंकर पुजारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT