कोकण

शिवडाव-बौद्धवाडीत २३ ला जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

CD

शिवडाव-बौद्धवाडीत २३ ला
जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः सम्यक समाज प्रबोधिनी, शिवडाव-बौद्धवाडी (रजि.) यांच्यातर्फे भारतीय बौद्ध महासभा मुंबई, गावशाखा शिवडाव, तसेच शिवडाव बौद्ध विकास संघ मुंबई, गावशाखा शिवडाव यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव २२ व २३ मे रोजी शिवडाव-बौद्धवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने २३ ला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व डान्स स्पर्धकांनी अधिकाधिक संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान गट (१ ते १४ वयोमर्यादा) व खुला (वयोमर्यादा १५) या दोन गटांमध्ये होणार आहे. लहान गट प्रथम २५०० रुपये, द्वितीय १५००, तृतीय १००० रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र, खुल्या गटासाठी प्रथम ३७०० रुपये, द्वितीय २५००, तृतीय १५०० रुपये, प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्र देण्यात येईल. सर्व इच्छुक स्पर्धकांनी अधिकाधिक संख्येने सहभाग घेऊन सहकार्य करावे. लहान गटातील स्पर्धकांनी वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राकेश कदम, सचिन पवार, संजय पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT