कोकण

‘डिझाईन’च्या अभ्यासासाठी वेदिका जाणार अहमदाबादला

CD

83110
वेदिका पेडणेकर


‘डिझाईन’च्या अभ्यासासाठी
वेदिका जाणार अहमदाबादला

सावंतवाडीच्या सुकन्येची निवड

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ ः अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येथे बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वेदिका पेडणेकर हिची निवड झाली आहे. वेदिका ही माजगाव-कुंभारवाडी (ता. सावंतवाडी) येथील रहिवासी आहे. देशभरातील ९० हजार विद्यार्थ्यांमधून सिंधुदुर्गातील कुंभार समाजातील सुकन्या वेदिकाची निवड झाल्याने तिचे सर्वस्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन शिक्षण संस्थेत ४८० जागांसाठी देशभरातून दीड लाख विद्यार्थिनींनी अर्ज केला होता. या प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. डिझाईन संबंधित पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत वेदिकाची निवड झाली. त्यानंतर डिझाईनसंबंधित केलेले काम, वेगळा दृष्टिकोन याबाबतचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. त्यानंतर मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये वेदिका हिने यश मिळविले. या विद्यार्थिनीची निवड अहमदाबाद येथे युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेत झाली आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. डिझाईनबाबत वेगवेगळ्या प्रकारचे धडे या चार वर्षांत घेतले जाणार असल्याचे वेदिकाने सांगितले. या यशात आई-वडिलांचे मोठे सहकार्य मिळाल्याचे वेदिकाने सांगितले. महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत शेदूलकर, सचिव विलास गुडेकर, माजी सिंधुदुर्ग कुंभार समाज जिल्हाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर, पत्रकार दिलीप हिंदळेकर यांनी वेदिकाचे अभिनंदन केले. वेदिकाचे वडील दीपक पेडणेकर सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये अभियंते असून, रोहा येथे कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT