कोकण

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत, निधी प्रथम

CD

83111
देवगड ः खालची धुरीवाडी-तळवडे येथे आयोजित एकल नृत्य स्पर्धेत लहान गटातील विजेती निधी खडपकरला बक्षिस देताना मान्यवर.

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत
मृणाल सावंत, निधी प्रथम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची-धुरीवाडी तळवडे (ता. देवगड) येथे नुकतेच धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या एकल नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिंगुळीची मृणाल सावंत, लहान गटात सावंतवाडीची निधी खडपकर विजेत्या ठरल्या.
खालची धुरीवाडी-तळवडेतर्फे आयोजित भव्य जिल्हास्तरीय एकल रेकॉर्ड नृत्य स्पर्धा शनिवारी (ता. ११) रात्री श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान येथे पार पडली. या स्पर्धेत मोठ्या गटात द्वितीय अनुष्का कांदळगावकर, तृतीय सिद्धी धुरी यांनी मिळविला. लहान गटात (१३ वर्षांखालील) द्वितीय साईशा धुरी, तृतीय क्रमांक सान्वी बाणे हिने मिळविला. मोठ्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ८ हजार, ४ हजार, २ हजार व आकर्षक चषक, लहान गटातील विजेत्यांना ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये तसेच प्रत्येकी आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कथ्थक विशारद सुप्रिया ढोके, आकाश सकपाळ यांनी केले. बक्षिस वितरणप्रसंगी सरपंच गोपाळ रुमडे, उपसरपंच भाग्यश्री धुरी, सचिन धुरी, योगेश धुरी, सुमित ढोके, ऋत्विक धुरी, अनिल धुरी, प्रकाश सावंत, सुहास धुरी, प्रमोद धुरी, दिलीप धुरी, वर्षा धुरी, नरेंद्र धुरी, स्वप्नील धुरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. प्रसाद दुखंडे यांनी निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT