कोकण

गोळवण येथे उद्या भवानी देवीचा गोंधळ

CD

गोळवण येथे उद्या
भवानी देवीचा गोंधळ
मसुरे ः नाभिक समाजाची कुलदेवता, गोळवण येथील आई भैरी भवानी देवीचा गोंधळ मंगळवारी (ता. १४) होणार आहे. दुपारी १२ वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता जोगवा, मांड भरणे, रात्री ८ वाजल्यापासून महाप्रसाद, रात्री १० वाजता दिवटीमध्ये तेल अर्पण करणे, रात्री ११ वाजता देवीचा काव्यमय कथायुक्त गोंधळ होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भैरी भवानी देवालय ट्रस्ट, चव्हाणवाडी मित्रमंडळ व मालवण तालुका नाभिक संघटना यांच्यावतीने करण्यात येत आहे.
---------------
कळसुलीत बुधवारी
विविध कार्यक्रम
कणकवली ः प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या विद्यमाने कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी (ता. १५) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ४.३० वाजता काकड आरती, ७ वाजता स्वामींची नित्यपूजा, ८.३० वाजता लघुरुद्र, १२ वाजता महाआरती, महाप्रसाद, दुपारी ३.३० वाजता गुरुचरित्र वाचन, सायंकाळी ५ वाजता भजने, ७ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता कीर्तन व १० वाजता स्थानिक कार्यक्रम होणार आहेत.
---------------
वराड येथे २४ ला
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
मालवण ः वराड बौद्ध विकास मंडळ, मुंबई गाव शाखा वराड यांच्यावतीने २४ मे रोजी आंबेडकरनगर-वराड येथे खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना अनुक्रमे ५५५० रुपये, ३५०० रुपये, २५०० रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी १५०० रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी योगेश वराडकर यांच्याशी संपर्क साधावा.
----------------
हरकुळमध्ये २० ला
सांस्कृतिक कार्यक्रम
कणकवली ः हरकुळ बुद्रुक-भटवाडी येथील मनोहर करंबेळकर यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्त पादुका मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त २० मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता पंचसुक्त पवमान, लघुरुद्र, महाभिषेक, श्रींची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता प्रवचन, ५ वाजता सुधांशू सोमण यांचे गायन, ७ वाजता आरती मंत्रपुष्प, रात्री ९ वाजता रोहण पुराणिक यांचे कीर्तन होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन मनोहर करंबेळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT