कोकण

जलजीविका, सिनर्जी मरीन ग्रुपतर्फे कौतुक सोहळा

CD

rat12p17.jpg
83121
रत्नागिरी : नवी मुंबईतील टी. एस. रहमान मर्चंट नेव्ही कॉलेजमध्ये कौतुक झालेल्या रत्नागिरी व महाराष्ट्रातील विद्यार्थिनी.
--------
जलजीविका, सिनर्जी मरीन
ग्रुपतर्फे कौतुक सोहळा
रत्नागिरी, ता. १३ : सिनर्जी मरीन ग्रुप व जलजीविका यांच्यावतीने नवी मुंबईतील टी. एस. रहमान मर्चंट नेव्ही कॉलेज येथे प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सिनर्जी ग्रुपचे विष्णू स्वामिनाथन तसेच टी. एस. रहमान कॉलेजचे प्राचार्य श्री. आशुतोष आणि जलजीविका संस्थेचे सीईओ व संस्थापक नीलकंठ मिश्रा उपस्थित होते.
कार्यक्रमांसाठी भारतातील अनेक कानाकोपऱ्यांमधून मर्चंट नेव्हीसाठी उत्सुक मुली निवडल्या होत्या. त्यात रत्नागिरी, पुणे, मुंबई, उत्तराखंड, राजस्थान येथून मुली उपस्थित होत्या. चक्रा स्कॉलरशिपमध्ये रत्नागिरीतील सेजल मयेकर (मांडवी), रेणुका कोलवार (जोशी पाळंद), पायल ब्रिड (लांजा), सायली बावदाने (प्रभानवल्ली), ईश्वरी पवार (गुहागर), श्रद्धा जाधव (रत्नागिरी) यांची निवड झाली. या मुलींना सिनर्जी मरीन ग्रुप यांच्यातर्फे जी. पी. रेटिंग, डीएनएस यासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि या स्कॉलरशिपचाच भाग म्हणून कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते. या मुलींनी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत सिनर्जी मरीन ग्रुप करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT