कोकण

जालगावमध्ये आज कबड्डी स्पर्धा

CD

पान ५ साठी, संक्षिप्त
जालगावमध्ये आज कबड्डी स्पर्धा
दाभोळ ः दापोली शहरालगत असलेल्या जालगाव येथील श्री देवी मरीआई क्रीडा मंडळ व दुर्गा स्पोर्टस्‌ व शौर्य ट्रॉफीजच्या वतीने ‘दापोली प्रो-कबड्डी लीग पर्व ३’ या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कबड्डी सामने १३ ते १५ मे असे तीन दिवस होणार असून, क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दापोलीत आज परशुराम जन्मोत्सव
दाभोळ ः कृतिशील ब्राह्मण युवक संघटनेतर्फे परशुराम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर सभागृहात सोमवारी (ता. १३) सायंकाळी ७.३० वाजता पुणे येथील अक्षय जोग यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

आसूद-मुरुड रस्त्याची दुरवस्था
दाभोळ ः दापोली तालुक्यातील आसूद ते मुरुड कर्दे या गावाकडे जाणारा रस्ता हा रस्ता नसून, खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथून जाताना अनेक पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या वाहनांचे नुकसान होत आहे. आधीच रस्ते अरुंद आहेत. त्यात पडलेले खड्डे यामुळे पर्यटकांना आसूदपासून मुरुडपर्यंत जायला अर्धा ते एक तास लागत असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाले असले तरी ते सुरू झालेले नाही. हा मार्ग पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचा मानला जात असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दापोली शिक्षक संघाचे अधिवेशन
दाभोळ ः राज्य प्रथमिक शिक्षक संघाच्या दापोली शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच झाले. अधिवेशनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांनी दापोली तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. शिक्षक संघाचे संदीप जालगावकर यांची दापोली तालुका प्रथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनात गुणवंत शाळा, शिक्षक व व विद्यार्थी गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी, नासा-इस्त्रो, व्हिजन दापोली, माझी स्वच्छ व सुंदर शाळा, एनएमएमएस यासारख्या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

Satara ZP Politics : साताऱ्यात झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा बहिष्कार; शंभूराज देसाई-मकरंद पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक', पण भाजपचा मार्ग झाला मोकळा

SCROLL FOR NEXT