कोकण

मालवणात तरुणाचा आकस्मिक मृत्यू

CD

८३०१२
अमोल परब

मालवणात तरुणाचा
आकस्मिक मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : शहरातील पर्यटन व्यावसायिक आणि शासकीय इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर अमोल सुरेंद्र परब (वय ३६) यांचे शनिवारी निधन झाले. टोपीवाला हायस्कूलच्या २००३ च्या दहावी बॅचच्या स्नेहमेळावा सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
अमोल परब हे गेले दोन दिवस आपल्या बॅचमधील विद्यार्थ्यांसमवेत विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते. शनिवारी सकाळी टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सहभागी झाले असतानाच अचानक ते अत्यवस्थ होऊन कोसळले. त्यांना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत येथील पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे. परब यांच्या निधनामुळे टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा संघटनेने स्थगित केला. सेवानिवृत्त एसटी अधिकारी सुरेंद्र परब, निवृत्त मुख्याध्यापिका सौ. परब यांचा ते मुलगा, हॉटेल व्यावसायिक प्रसाद परब यांचे भाऊ, माजी नगरसेविका संध्या परुळेकर व उद्योजक राजन परुळेकर यांचे जावई होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT