कोकण

निढळेवाडीतील नियमित वापराची पाखाडी नष्ट

CD

१४ (टूडे २ साठी, सेकंड मेन)

- rat१३p२.jpg-
P२४M८३२७३
निढळेवाडी येथील त्या पाखाडी झालेली अवस्था.

निढळेवाडीतील ‘ती’ पाखाडी नष्ट

ग्रामस्थांची गैरसोय ; दोन मंत्र्यांना निवेदन देऊनही काम जैसे थे

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या उभारणीचे काम गेली अनेक वर्षे चालू आहे. संगमेश्वरजवळील निढळेवाडी येथील खोदकाम नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आले. त्यात येथील नियमित वापराची पाखाडी नष्ट झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना त्रास होत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजिनक बांधकाम अधिकाऱ्यांची संगमेश्वर शासकीय वस्तीगृहात ग्रामस्थांनी भेट घेतली. त्या वेळी का. अ. जाधव यांनी तातडीने संरक्षक भिंत बांधून आतून पाखाडी करून देऊ सांगितले होते तथापि त्यानंतर ७-८ महिने कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे १ जुलै २०२३ ला देवरूख येथे झालेल्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारमध्ये सरपंच समीर जट्यार यांनी गाऱ्हाणे मांडले होते. कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांनी लेखी आदेश दिले होते. या व्यतिरिक्त उपविभागीय अधिकारी तथा सक्षम राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ भूसंपादन यांनी २८ जुलै २०२३च्या पत्राने पाखाडी बांधकामाबाबत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज जवळपास ७०० लोकवस्तीच्या गावातील लोकांना पाखाडी उभारणीकरिता वस्तीपासून महामार्गापर्यंत चार गुंठे जमिन सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी प्रभाकर वाडकर यांनी मोफत दिली होती. त्याचप्रमाणे प्रस्तूत महामार्गासाठी तीन गुंठे जमिन शासनाला दिली होती. आज तेच नागरिक घरातून महामार्गावर कसे जायचे, या विवंचनेत आहेत. पालकमंत्री वा प्रांत कार्यालय यांच्या सूचनेनंतरही कार्यवाही न झाल्यामुळे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाहणीदौऱ्यात प्रभाकर वाडकर यांनी सरपंच समीर जट्यार यांच्यासह धामणी येथे मंत्र्यांना पाखाडी व संरक्षक भिंत मागणीचे निवेदन दिले. कार्यकारी अभियंता जाधव यांनीही स्वतः काम तातडीने सुरू करून पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही सहा ते सात महिने झाले तरीही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पुन्हा पावसाळा जवळ आला तरी बांधकाम खात्याकडून काहीच हालचाल होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
-----------------
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT