कोकण

बसस्थानक टार्गेट

CD

२९ (पान ३ साठी)


चोरट्यांकडून बस स्थानकातील प्रवासी टार्गेट

महिन्यात किमंती ऐवज चोरीचे चार प्रकार ; टोळीचा संशय, पोलिसांसमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : मुंबई-गोवा महामार्गावरील बस स्थानकावरून प्रवाशांना लुटणारी टोळी कार्यरत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वारंवार होत असताना पोलिसांना यातील एकाही गुन्ह्याचा शोध घेता आलेला नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, खेड, महाड, रोहा, श्रीवर्धन येथील बस स्थानकावरील प्रवाशांना चोरटे टार्गेट करीत आहेत. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मोठ्या शहरातील नागरिक बस आणि रेल्वेने घरी येत आहेत. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होत आहे. बसमध्ये चढण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांचे कधी मोबाईल चोरतात तर कधी दागिने चोरतात. सोन्याचे दागिने चोरी करताना हे चोरटे वयोवृद्ध महिलांना जास्त टार्गेट करीत आहे.
महिनाभरात पोलादपूर, खेड आणि चिपळूण बस स्थानकावरील प्रवाशांना लुटण्यात आले. चिपळूणमधून लोटेकडे जाणाऱ्या महिलेचे सोने लुटण्याचा प्रकार आठ दिवसापूर्वी घडला. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा १० मे रोजी असाच प्रकार घडला. खेड येथील एसटी स्थानकातून एका महिला प्रवाशाची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरीस गेली. पोलादपूर तालुक्यातील महालगूर येथील एका वृद्धेच्या हातातील २ सोन्याच्या बांगडया अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना पोलादपूर एसटी स्थानकामध्ये घडली असून याप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महाड बस स्थानकावर एका प्रवाशाचा मोबाईल चोरण्यात आला.
महिनाभरात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील बस स्थानकावर चार प्रवाशांना लुटण्यात आले. मात्र यातील एकाही गुन्ह्याचा पोलिसांना तपास करता आलेला नाही. बस स्थानकावरील होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार थांबवण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
--------------
कोट
मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरीतून जास्त पैसा मिळत असल्यामुळे आणि या वस्तू बस स्थानकावरील प्रवाशांकडे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे चोरट्यांनी बस स्थानकाकडे मोर्चा वळवला आहे. त्यांची चोरीची पद्धत एक सारखी आहे. बस स्थानकावर सीसीटीव्ही आणि पोलिस तैनात असणे गरजेचे आहे.
--सुहास चव्हाण, ग्रामस्थ, मार्गताम्हाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT