कोकण

बौद्धजन समिती अध्यक्षपदी चंद्रकांत सावंत

CD

२० (टूडे २ साठी)

चिपळूण बौद्धजन समिती
अध्यक्षपदी चंद्रकांत सावंत

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत सावंत यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून, सरचिटणीसपदी पत्रकार संदेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या तालुका कार्यकारिणीची निवडणूक ११ मे रोजी शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात घेण्यात आली. या निवडणुकीत संस्थेच्या मॅनेजिंग कमिटी सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. या वेळी तीन पदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली तर दोन पदे या अगोदरच बिनविरोध निवडण्यात आली होती. त्यानुसार संस्थेच्या स्थानिक अध्यक्षपदी चंद्रकांत सावंत (चिपळूण विभाग), सरचिटणीसपदी संदेश पवार (तिसगाव विभाग ), खजिनदारपदी संतोष सावंत (कुटरे विभाग), उपाध्यक्षपदी बुद्धघोष गमरे (चिवेली विभाग), गणपत सावंत (सावर्डे विभाग), सहचिटणीसपदी प्रमोद कांबळे (गाव विभाग), तुकाराम सकपाळ (वहाळ विभाग) यांची निवड करण्यात आली तर यापूर्वीच सरचिटणीसपदी संदेश पवार व खजिनदारपदी संतोष सावंत यांची बिनविरोध निवड झाली होती.
हिशेब तपासणीस हे पद रिक्त राहिले असून, ते लवकरच भरण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य विजय मोहिते, डॉ. अशोक सकपाळ, वसंत गमरे, रोहित जाधव आणि संजय जाधव यांनी काम पाहिले. निकाल जाहीर केल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि संस्थेच्या मुंबई मुख्य कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. निवडीनंतर अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी आपण संस्थेचे कामकाज सर्वांना सोबत घेऊन अधिक विश्वासाने आणि सक्षमपणे पार पाडू, असे अभिवचन देतानाच संस्थेच्या व्यापक हितासाठी नवनवीन उपक्रम, कार्यक्रम राबवण्याचा आपला मानस आहे. संस्थेच्या मुख्य कमिटीबरोबर विचारविनिमय करून संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमची संपूर्ण कमिटी कार्यरत राहील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT