कोकण

-गुन्ह्याचे पुरावे द्या नंतर खुलासा करू

CD

२१ (टूडे २ साठी)

आदी पुरावे द्या नंतर खुलासा करू

रईस अलवी यांची मागणी ; मुख्याधिकाऱ्यांना पाठवले पत्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शकील सावंत यांची बदनामी व मानहानी कशी केली? या संदर्भात तक्रारदाराने कोणते पुरावे दिले आहेत त्याची आम्हाला माहिती द्या, अशी मागणी माजी आमदार रमेश कदम आणि रईस अल्वी यांनी चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी तथा आचारसंहिताभंग प्रमुख यांच्याकडे केली आहे. अल्वी यांनी या संदर्भातील माहिती ''सकाळ''ला दिली.
अ. बशीर पिलपिले (रा. सैतवडे, रत्नागिरी) व अपक्ष उमेदवार शकील सावंत (रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. शकील सावंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या विकासासंदर्भातील मुद्दे घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार रमेश कदम आणि राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष रईस अलवी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक रंग देऊन शकील सावंत यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, माजी आमदार रमेश कदम व रईस अल्वी यांना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ६ मे रोजी नोटीस काढली आहे. या नोटीसीद्वारे रितसर खुलासा सादर करण्याची सूचना केली आहे.
-------------
कोट
मुख्याधिकारी तथा आचारसंहिता भंग प्रमुख यांची नोटीस मिळाली. दोन दिवस शासकीय सुट्टी होती. आम्ही नक्की काय गुन्हा केला आहे, तक्रारदाराने आमच्या विरोधात कोणती कागदपत्रे आणि कोणते पुरावे सादर केले आहेत ते आम्हाला माहितीसाठी मिळावेत, अशी मागणी आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. ती कागदपत्रे मिळाल्यानंतर आम्ही आमची बाजू त्यांच्याकडे मांडू.

--रईस अल्वी, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT