कोकण

किसान सन्मानचे ११ हजार शेतकरी वंचित

CD

किसान सन्मानचे ११ हजार शेतकरी वंचित
ई-केवायसी, आधार लिंकची समस्या; वर्षभरात सहा हजाराचा लाभ
रत्नागिरी, ता. १३ : पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. आतापर्यंत दोन हजारांचे १६ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत; मात्र, ई-केवायसी नसल्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ४४४ शेतकरी तर आधार सिडींग नसल्यामुळे ९ हजार १०२ शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.
अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत तर काही शेतकरी मृत झाल्याची अद्याप वारसांनी नोंद केलेली नाही शिवाय आधार सिडींग व ई-केवायसी न केल्यामुळेही ‘पीएम’ किसान सन्मान निधीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. पीएम किसानसाठी ई-केवायसी व आधार संलग्नीकरण होणे आवश्यक आहे. एकूण ११ हजार ५५६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यात ९८ टक्के ई-केवायसी काम पूर्ण झाले आहे. १ लाख ६१ हजार ६३५ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत. त्यापैकी १ लाख ५९ हजार १९१ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. अद्याप २ हजार ४४४ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे ई-केवायसीचे अद्याप दोन टक्के काम अपूर्ण आहे तसेच जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ५२ हजार ५३९ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप ९ हजार १०२ शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकरी किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी ई-केवायसी मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात आली होती तसेच ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती.

चौकट
ग्राफ ः 83369

तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी

तालुका लाभार्थी
मंडणगड ६,१५८
दापोली २०,१२९
खेड १७,४३४
चिपळूण २३,२००
गुहागर २१,६५८
संगमेश्वर २१,६६५
रत्नागिरी २०,८२०
लांजा १४,३००
राजापूर १६,२७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT