कोकण

प्रत्येक विधानसभा संघनिहाय भरारी पथक

CD

प्रत्येक विधानसभा संघनिहाय भरारी पथक
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह ; पदवीधर मतदारसंघ निवडणूक
रत्नागिरी, ता. १३ : जिल्ह्यात लोकसभेच्या धामधुमीनंतर आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बैठक घेतली. त्याअनुषंगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक भरारी पथक कार्यरत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आढावा घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या. सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल घेवून ते लवकरच पाठवावेत, एमसीएएमसी, एमसीसी समिती स्थापन करा, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक भरारी पथक कार्यरत ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होत असून आचारसंहिता ८ मे ते १८ जून या कालावधीत लागू असेल. आचारसंहितेचेही काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तीन दिवसांत पंतप्रधान मोदींची माफी मागा, अन्यथा.... ; संसदीय स्थायी समितीचा मार्क झुकरबर्ग यांना थेट इशारा

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT