कोकण

ओटव फाटा ब्रीजवरील बहुतांश पथदिवे बंदच

CD

83378
नांदगाव ः ओटव फाटा येथील ब्रीजवरील पथदिवे अनेक दिवस बंद आहेत. (छायाचित्र ः एन. पावसकर)

ओटव फाटा ब्रीजवरील
बहुतांश पथदिवे बंदच

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ ः नांदगाव ओटव फाटा ब्रिजवरील बहुतांश पथदिवे बंदच असून याबाबत महामार्ग प्राधिकरणकडे वारंवार सुचना करुनही सबंधित कंपनीकडून दखल घेतली जात नाही. येत्या आठ दिवसांत सुधारणा न केल्यास सोमवारी (ता.२०) त्याच ब्रिज खाली ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग प्राधिकरणला निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव येथील ब्रिज सेवा रस्त्यावर स्ट्रीट लाईट ट्रान्सफॉर्मरसाठी सुरुवातीला जागा उपलब्ध होत नव्हती. पण, आता जागा उपलब्ध असून ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. त्यानंतर पथदिवे चालू करण्यात आले होते. मात्र, ते आठ दिवसांच्या आतच निम्मे बंदावस्थेत आहेत. याबाबत आपल्याला वारंवार मोबाईलद्वारे याची कल्पना दिली होती. जवळपास हे पथदिवे गेले दोन महिने बंद आहेत. येत्या आठ दिवसांत बंद स्थितीत असलेले पथदिवे सुरळीतपणे न केल्यास २० मेस सकाळी १० वाजल्यापासून एक दिवसाचे ठिय्या आंदोलन याच नांदगाव ओटव फाटा ब्रिजखाली केले जाईल, असा इशारा नांदगाव येथील मोरजकर यांनी महामार्ग प्राधिकरणला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT