कोकण

निवतीत साई मंदिर वर्धापन दिन सोहळा

CD

निवतीत साई मंदिर
वर्धापन दिन सोहळा
म्हापण ः निवती येथील साईबाबा मंदिराचा २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यास आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्त बुधवारपर्यंत (ता. १५) विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज सकाळी अभ्यंगस्नान, लघुरुद्र, नामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी पादुका मिरवणूक व दिंडी, रात्री भजने आदी कार्यक्रम झाले. उद्या (ता. १४) सकाळी १०.३० वाजता महिला हरिपाठ, दुपारी २ वाजता श्रींची महापूजा, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, ७ वाजता भजने, रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, बुधवारी (ता. १५) पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी १०.३० वाजता हरिपाठ, दुपारी १२ वाजता साईभंडारा व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजने, रात्री ९ वाजता चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी, कुडाळचा ‘जलवा’ कार्यक्रम होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन साई निवती मेढा ग्रामस्थ मंडळाने केले आहे.
--
सावंतवाडी शहरात
गव्यारेड्यांचा वावर
सावंतवाडी ः शहरात गवारेडे लोकवस्तीत गव्यांच्या वावराने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखाते फटाके वाजवून गव्यांवा पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून जंगलातील झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्यप्राण्यांना जंगलात पाणी व अन्न मिळत नाही. अन्न साखळीतील वन्यजीव देखील जंगलात नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीमध्ये घुसतात, असे चित्र आहे. गव्यांना जंगलात खाद्य व पाणी मिळवून देण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
---
सेवानिवृत्त संघटनेची
मासिक सभा स्थगित
सावंतवाडी ः सध्या मे महिन्यात कडक उन्हाळा असल्याने या महिन्यात होणारी संघटनेची मासिक सभा स्थगित करण्यात आली आहे. संघटनेच्या सर्व ज्येष्ठ सभासदांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी-दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी संभाजी कांबळे यांनी केले आहे. मेमध्ये अतिउष्मा असल्याच्या कारणास्तव संघटनेची मासिक सभा स्थगित ठेवण्यात आली आहे.
--
कुणकेरी येथे आज
‘भजनारंग’ कार्यक्रम
ओटवणे ः कुणकेरी श्री भवानी मंदिर येथे उद्या (ता. १४) सायंकाळी ५ वाजता ‘भजनारंग’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. पखवाज अलंकार महेश सावंत प्रस्तुत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT