कोकण

भडगावात गुरुवारी धार्मिक कार्यक्रम

CD

भडगावात गुरुवारी
धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः तालुक्यातील भडगाव खुर्द येथील श्री देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा व श्री देव गिरोबा मायंदेश्वर मंदिर नूतन सभामंडप उद्‍घाटन सोहळा १६ व १८ मे रोजी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री देव गिरोबा मायंदेश्वर मंदिर सभामंडप उद्‍घाटनानिमित्त गुरुवारी (ता. १६) सकाळी १० वाजता लघुरुद्र, अभिषेक, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्रींची महापूजा, ६ वाजता आरती व तीर्थप्रसाद, ७ वाजता हरिपाठ, स्थानिक मंडळांची भजने, महाप्रसाद, रात्री १० वाजता श्री पावणाई लोककला दशावतार मंडळाचे (हरकुळ खुर्द) नाटक, रवळनाथ मंदिर वर्धापनानिमित्त शनिवारी (ता. १८) सकाळी १० वाजता लघुरुद्र, अभिषेक, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्रींची महापूजा, ६ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, ७ वाजता हरिपाठ, भजने, महाप्रसाद, रात्री ९ वाजता सद्‌गुरु संगीत मंडळ कुडाळ (बुवा-वैभव सावंत) व श्री कोटेश्वर मंडळ, हरकुळबुद्रुक (बुवा-सुजित परब) यांच्यात डबलबारी सामना होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भडगाव खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.
---
दुसऱ्या दिवशीही
सावंतवाडीत पाऊस
सावंतवाडी ः सावंतवाडी शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. शहर आणि परिसरात शनिवारी सुमारे दोन ते अडीच तास पाऊस कोसळला होता. त्यामुळे गेले काही दिवस उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, शेतकरी वर्गाची खूपच धावपळ झाली. अजूनही शेतकऱ्यांची मॉन्सूनपूर्व कामे बाकी आहेत. रविवारी सकाळपासून आकाश निरभ्र होते. परंतु दुपारनंतर ढग जमा होऊ लागले. रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊण तास पाऊस कोसळला. पावसामुळे अधूनमधून वीज खंडित झाली होती.
--------------------
बिबट्याकडून
वासरु फस्त
सातार्डा ः ओटवणेवाडी येथील अमित नागवेकर यांच्या मालकीचे गायीचे वासरू बिबट्याने फस्त केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढला आहे. वनविभागाचे अधिकारी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ अमित नागबेकर यांनी वासराला नायलॉन दोरीने अंगणात बांधले होते. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने त्या वासरावर हल्ला केला. नायलॉन दोरी न तुटल्याने बिबट्याने वासराला अंगणात फस्त केले. घटनेची पाहणी सातार्डा पशुधन पर्यवेक्षक डॉ. एल. ए. गावडे यांनी केली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT