कोकण

पांढरा समुद्र - भाटकरवाडा टप्पा डेंजर झोनमध्ये

CD

८३४१३
रत्नागिरी ः मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे सुरू असलेले काम.

‘पांढरा समुद्र-भाटकरवाडा’ डेंजर झोनमध्ये

मोठे दगड टाकून संरक्षित करणार; मिऱ्या बंधाऱ्याचे काम रखडले, पत्तन विभाग लक्ष ठेवून

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : पांढरा समुद्र ते भाटकरवाडा या टप्प्यातील मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे. ‘डेंझर झोन’मधील हा भाग आहे. या पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु येथे तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. मोठे दगड टाकून धोकादायक भाग संरक्षित केला जाणार असल्याचे पत्तन विभागाने सांगितले.
मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू असले तरी ते धिम्या गतीने सुरू आहे. याबाबत स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले आहे. त्यामुळे विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी सुमारे १६० कोटी मंजूर झाले आहेत. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षांत पूर्ण करायचा अवधी आहे. मुरूगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या येथील टेट्रापॉड्स व ग्रोयनच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. भाटकरवाड्यापासून पुढे हे काम अगदी आलाव्याच्याही पुढे गेले आहे. यामुळे चार धोकादायक ठिकाणे यामध्ये निघून गेली आहेत; परंतु पांढरा समुद्र ते भाटकरवाडा या भागातील काम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे; परंतु अजूनही तांत्रिक गोष्टी आड येत असल्याने हे काम थांबले आहे. यंदाच्या पावसाळ्यात या भागात उधाणामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांमध्येही त्याबाबत भीती आहे. धोका निर्माण होऊ नये यासाठी पत्तन विभागाने तात्पुरती मलमपट्टी म्हणून धोकादायक भागात मोठे दगड टाकून तो सुरक्षित करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्तन विभागाने दिली. लवकरच हे काम सुरू केले जाणार आहे.

तात्पुरती मलमपट्टी
या भागात पावसाळ्त उधाणामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थांमधून भीती व्यक्त होत आह. तात्पुरती मलमपट्टी म्हणून पत्तन विभागाकडून या डेंजरझोनमध्ये ठे दगड टाकून हा भाग सुरक्षीत केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT