कोकण

खारेपाटण येथे शिबिरात ५० जणांची नेत्र चिकित्सा

CD

८३४२१

खारेपाटण येथे शिबिरात
५० जणांची नेत्र चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : बौद्धजन सेवा संघ विभाग, खारेपाटण या संघटनेच्यावतीने खारेपाटण-पंचशीलनगर अंगणवाडी केंद्र येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर झाले. या शिबिराचा ५० जणांनी लाभ घेतला. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ तांबे, बौद्धजन सेवा संघ १२ गाव संघटना खारेपाटण या संघटनेचे मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष अशोक कांबळे, ग्रामीण संघटनेचे चिटणीस सचिन कोर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, स्थानिक पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे कार्यकर्ते संदीप पाटणकर, मनोज पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात उपस्थित डॉ. सिद्धार्थ तांबे यांचे खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभागाच्यावतीने चिटणीस कोर्लेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी १२ गाव संघटनेचे कार्यकर्ते चिटणीस सागर पोमेडकर, महेंद्र कदम, दीपक पगारे, सत्यवान जाधव, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोर्लेकर यांनी केले. आभार महेंद्र कदम यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT