कोकण

खेडसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

CD

८३३९७
८३३९८


खेड, दापोलीत वादळी पाऊस
जनजीवन विस्कळित : झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या वादळी पावसानंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. दोन तास कोसळलेल्या पावसाने कहर केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन अंशतः विस्कळीत झाले.
पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काळोख दाटून येत काही क्षणात वादळी वारे व विजेच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने वातावरणामध्ये गारवा आला. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. ग्रामीण भागालादेखील मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान, वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर मात्र कायम राहिला होता.


संगमेश्वरमध्येही हजेरी
दापोली तालुक्यातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली; परंतु असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासाही मिळाला. संगमेश्वर तालुक्यात रविवारी रात्री पावसाचा शिडकावा झाला. सोमवारी दुपारपासून पावसाळी वातावरण तयार झाले होते. काही भागात वादळी वारे झाले. देवरूखला पावसाचा शिडकावा झाला. काही भागात थोडासा पाऊस झाला. अवकाळी पावसाने आंबा बागायतदार व आंबा विक्रेते यांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT