कोकण

जानवलीत १८ला भजनाचा सामना

CD

जानवलीत १८ला
भजनाचा सामना
कणकवली ः जानवली वाकडवाडी येथे १८ मे रोजी डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने चंद्रशेखर उर्फ गोट्या राणे यांच्या निवासस्थानी हा भजनाचा सामना होणार आहे. भरणी (कुडाळ) येथील बुवा योगेश पांचाळ आणि नागवे (कणखवली) येथील बुवा अमेय आर्डेकर यांच्यात हा सामना रात्री ९ वाजता होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राणे कुटुंबीयांनी केले आहे.
-----------
कनेडी बाजारात
वाहतुक कोंडी
कनेडी ः येथील बाजारपेठेत सकाळच्या सत्रात वाहतुकीची कोंडी होत आहे. मुंबई येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपली वाहने घेऊन आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे. काही रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा जागोजागी उभ्या करत आहेत. या रस्त्यावर जेव्हा एसटी बसगाड्या उभ्या केल्या जातात तेव्हा दोन वाहनांना मार्ग काढता येत नाही. त्यामुळे कनेडी बाजारात वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी वाहतूक पोलिस नेमावा, अशी मागणी होत आहे.
------------
भिरवंडे परिसरात
पावसाची हजेरी
कनेडी ः सह्याद्री पट्ट्यात सोमवारी वादळी पावसाने हजेरी लावली. भिरवंडे, हरकुळ खुर्द परिसरात तुरळक पाऊस झाला. पावसामुळे हवेतील तापमानात घट झाल्याने उखाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस उन्हाचा पारा तापला आहे. मात्र, आता मॉन्सूनपुर्व पावसाची चाहुल लागल्याने शेतकरी सुखावला आहे. अचनक आलेल्या पावसामुळे गावातील धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT