कोकण

घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी अमृत बर्जे

CD

२४ (टुडे पान २ साठी, अॅंकर)


-rat१४p१३.jpg-
२४M८३५४८
घोसाळे : घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी अमृत बर्जे यांना सन्मानित करताना अध्यक्ष मनोज घाडे.
----------

अमृत बर्जेंना ‘घोसाळे रत्नभूषण’ पुरस्कार

साई भंडारा, महापूजा कार्यक्रम; मंदिराच्या जिर्णोद्धाराची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ ः तालुक्यातील घोसाळे येथील श्री साई विश्वस्त मंडळ, प्रगती महिला मंडळ व साईदीप क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई भंडारा, सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वडवली गावचे सामाजिक कार्यकर्ते व बहुश्रुत व्यक्तिमत्त्व अमृत बर्जे हे यंदाचे घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले.
अध्यक्ष मनोज घाडे यांच्या देखरेखखाली कार्यक्रम उत्साहात झाला. सकाळी पहाटे साई अभिषेक, काकड आरती, कळस पूजन ध्वजरोहण, होम हवन, साई पालखी मिरवणूक, श्रीसत्यनारायण पूजा, महाप्रसाद, हळदीकुंकू, ग्रामस्थांचे सुस्वर भजन, संस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम झाले. समाजातील विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे व पडद्याआड राहणाऱ्या व्यक्तिमत्वाना शोधून पुरस्काराने सन्मानित करण्याची वैचारिक परंपरा गावाने जोपासली आहे. यावर्षी विशेष सत्कार मूर्ती वडवली गावचे अमृत बर्जे यांना घोसाळे रत्नभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मोठ्या जल्लोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साईच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. घराघरात पालखीचे स्वागत करण्यात आले. रात्री विविध गुणदर्शन कार्यक्रमात कला कौशल्याचे सादरीकरण करून वाहव्वा मिळवली. संघटित आणि गाव एकोप्प्याने वाटचाल करणाऱ्या घोसाळे गावाने यावर्षी पासून साई मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याचा संकल्प सोडला आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज घाडे यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्दारची घोषणा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT